Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमपोलिसाचा हुबेहूब पोशाख घालून फिरणाऱ्याला अटक..!

पोलिसाचा हुबेहूब पोशाख घालून फिरणाऱ्याला अटक..!

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

मुंबई/ जी.अनंतकुमार /पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबई पोलिसांचा हुबेहूब पेहराव करून फिरणाऱ्या तोतया पोलिसाला पकडण्यात विलेपार्ले पोलिसांना पोलिसांना यश आले आहे. आरोपी कमांडोप्रमाणे टोपी, बूट व दुचाकीवर पोलिसांचे चिन्ह लावून हा तोतया फिरत होता. त्याच्याविरोधात तोतयागिरी कलमांवये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तसेच या तरूणाने पोलीस टोपी का घातली ? याबाबत चौकशी करण्यात आली. या घटनेप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी कमांडोप्रमाणे टोपी आणि बूट विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केला .

संशय आल्यामुळे या तरुणाला विलेपार्ले पोलीस ठाण्यात घेतले आणि विलेपार्ले पोलीसांनी या तरुणाविरोधात भादंवि कलम ४१९, १७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमान दीपक मिश्रा असे त्या तरुणांचे नाव आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या