Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगावचा श्री.प्रदिप पाटील या अवलियाने सुरू केले वाढदिवसानिमित्त बाल वाचनालय

जळगावचा श्री.प्रदिप पाटील या अवलियाने सुरू केले वाढदिवसानिमित्त बाल वाचनालय

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे..

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव पिंप्राळा येथील प्रदिप पाटील हा तरुण मागील बारा वर्षापासून सामाजिक , शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कार्य करीत आहे , राहत्याघरीच त्यांच्या झोपडीतच त्याने वस्तीतील मुलांना शिक्षणाचे महत्त्व पठवत वर्ग सुरू केला. त्याच वर्गाचा विद्यार्थी सागर वरपे आज डी. आय. डी. शो मध्ये संपूर्ण देश भरात आपल्या जळगावचे नाव करीत आहे ,तो विद्यार्थीही या अवलियाने घडविला आहे , असे अनेक विद्यार्थी घडवण्याचे कार्य या तरुणाने केले आहे , तसेच आजतागायत केशव स्मृती प्रतिष्ठानच्या समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवर हरविलेल्या दिशाहीन झालेल्या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणून त्यांच्या परिवाराशी जोडण्याचे कार्य करीत आहे , त्याच बरोबर अनेक युवक पोलीस भरती करतात , पण काही कारणाने भरती होत नसतात व आत्महत्याकडे वळतात , असल्या मुलांसाठी या युवकाने ( MCF फोर्स ) मातृभूमी कमांडो फोर्स सुरू करून या मुलांना आपत्ती प्रशिक्षण देऊन पोलीस प्रशासना सोबत खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्याचे कार्य करीत आहे , तसेच हे करता करता पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे एम.एस डब्लूला प्रथम वर्षाला शिकत आहे.


आज त्या अवलिया तरुणाचा वाढदिवस त्यांचा वाढ दिवसावर त्यांनी कुठलाही खर्च न करता , टरबूज कापून साध्या पध्दतीने वाढ दिवस साजरा केला. त्यांनी त्यांच्या वाढ दिवसा निमित्ताने व जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने झेप घेणाऱ्या पंखांना ज्ञानाचे बळ देणारी पुस्तके जीवनात सप्तरंगही उधळतात. जर तुमच्याकडे 100 रुपये असतील तर 50 रुपयात जेवण व 50 रुपयाच पुस्तक ग्यावे. या विचारातील प्रदिप या तरुणाने वस्तीतील मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने बाल वाचनालय सुरू केले , तसेच जमलेल्या बालकांना शिक्षणाचे महत्व पटवून उजळणीचे, गोष्टीचे पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप केले .
बालकांना वाचण्यासाठी 150 पेक्षा जास्त पुस्तक त्यांनी उपलब्ध करून दिली आहेत . त्यांच्या मातोश्री शोभाबाई पाटील यांच्या हस्ते वाचनालयाला सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांचे वडील गोकुळ पाटील , त्यांची पत्नी वर्षा पाटील , त्यांचे लहान बंधू नितीन पाटील , कमांडो फोर्सचे दीपक महाले , पृथ्वीराज पाटील , तसेच बालकांसोबत पालक ही उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या