Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याशिक्षकांचे वेतन व पेन्शन वेळेत मिळण्यासाठी उपोषण करणार: शिवानंद भरले

शिक्षकांचे वेतन व पेन्शन वेळेत मिळण्यासाठी उपोषण करणार: शिवानंद भरले

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता न्यूज लाईव्ह…

सोलापूर /जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/ पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापूर-जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या पेन्शन व वेतनासाठी वेळेवर आर्थिक तरतूद करा अन्यथा शिक्षण संचालक पुणे कार्यालयासमोर 15 मे नंतर प्रातिनिधिक स्वरूपात शासनाचे लक्ष वेधण्याकरीता एक दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते शिवानंद भरले यांनी घेतला आहे. शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन व पेन्शन गेल्या दीड दोन वर्षापासून वेळेत होतच नाहीत, प्रशासनाकडे विचारणा केली असता शासनाकडून आर्थिक तरतूदच उपलब्ध नाही म्हणून वारंवार सांगितले जाते. शिक्षक सोडून इतर कर्मचाऱ्यांचा अधिकार्‍यांचाअगदी वेळेत पगार होतो शिक्षकांनाच निधी नाही म्हणून सागंतात शिक्षक हे परदेशातील आहेत का? त्यांच्यासाठी पैसा काय परदेशातून उपलब्ध होतोय का? असे संतप्त सवाल शिक्षकातून उमटत आहेत. सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम इतर कर्मचारी अधिकारी घेतात परंतु शिक्षकांनी गेल्या कोरोना काळात वैद्यकीय उपचार घेतलेल्या प्रतीपुर्तीची वैद्यकीय बीले मंजूर असून रक्कमा मिळत नाही. पगार आणि पेन्शन दरमहा 27/28 तारखेलाच मिळतो, काही वेळेला दोन दोन महिन्याचा पगार केला जातो यामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत. समाजात शिक्षकांची आर्थिक पत राहीली नाही. शिक्षकांच्या सामाजिक प्रतिष्ठेचे अवमुल्यन होत आहे.
शिक्षकांच्या वेतन व पेन्शनसाठी वेळेत आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात यावे व सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम, वैद्यकीय बीलासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी भरले यांनी केली आहे .अन्यथा जिल्ह्यातील वयस्कर सेवानिवृत्त शिक्षकांना घेऊन शिक्षण संचालक पुणे कार्यालयासमोर एक दिवसाचे प्रातिनिधिक स्वरूपात उपोषण करणार असल्याचे निवेदन शिक्षण सचिव शिक्षणायुक्त शिक्षण संचालक यांना सादर केले आहे. त्याच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना पाठविले आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या