Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावपूर्वसूचना न देता अनेक सेतू केंद्र बंद.. ! विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय, महसूल...

पूर्वसूचना न देता अनेक सेतू केंद्र बंद.. ! विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय, महसूल अधिकाऱ्यांना निवेदन

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव ,बोदवड,चोपडा तसेच अमळनेर येथील अनेक सेतू केंद्र बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत असून हाल होत आहे,यामुळे कमालीचा संताप व्यक्त होत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अमळनेर तालुक्यातील २२ सेतू केंद्र, महाऑनलाईन केंद्र २१ पासून बंद झाले आहेत. तर चोपडा येथील 4 , चाळीसगाव येथील 7 ,बोदवड येथील 3 सेतू केंद्र अचानक बंद करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे; हे सेतू केंद्र परत सुरू करण्याची मागणी सेतू चालकांनी महसूल अधिकाऱ्यांकडे केली आहे.

अमळनेर तालुक्यातील भाऊसाहेब वारुळे यांचे बसस्थानक जवळील, प्रवीण पाटील यांचे रेणुका ऑनलाईन, पन्नालाल माळी यांचे मराठा मंगल कार्यालयाजवळ, प्रवीण पाटील यांचे रेणुका ऑनलाईन, नितीन वानखेडे यांचे भूमि अभिलेख कार्यालयजवळील ,कमलेश पाटील यांचे अनिल पोहा जवळील, उदय पाटील यांचे रसमंजू कॉम्प्लेक्स व देना बँक जवळ, प्रतीक पाटील, स्वामी समर्थ गेट जवळ, नितीन पाटील, जोशी पुरा, भरत पाटील, यश ऑनलाईन, संदेश जाधव धुळे रोड, अतित जैन, डी आर कन्याशाळा, राहुल ठाकरे, कोर्टासमोर, किशोर पाटील तहसील कार्यालयाजवळ, प्रताप ऑनलाईन व प्रताप सायबर, ज्ञानेश्वर पाटील, मंगलेश्वर शॉपिंग कॅप्लेक्स, तुषार भामरे, स्वामी समर्थ गेट समोर, विवेक पाटील पातोंडा,तुकाराम पाटील, आनंदराव पाटील, निवृत्ती वाघ , ढेकू रोड, संजय वैद्य राजभवन शेजारी आदी सेतू व महाऑनलाईन केंद्र बंद करण्यात आले आहेत.यामुळे शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल होत आहेत.
सेतू केंद्रे पुन्हा सुरू करावीत आम्हाला पूर्वसूचना न देता बंद केल्याने आमच्या व सहकारी अशा १०० ते दीडशे कुटुंबावर उध्वस्त होण्याची वेळ आली आहे असे निवेदन सेतू चालकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात संतोष बावणे व निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील यांना दिले आहे. बंद करण्यात आलेले सेतू सुविधा केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावे अन्यथा उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असा सूर केंद्र संचालकांचा आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या