Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावधान्य महोत्सवात गारपीट ,शेतकऱ्यांचे नुकसान, मंडप उडून झाली तोडफोड...

धान्य महोत्सवात गारपीट ,शेतकऱ्यांचे नुकसान, मंडप उडून झाली तोडफोड…

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇👇

जळगाव/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  कृषी विभागातर्फे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा, जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेतर्फे शिवतीर्थ मैदानावर धान्य महोत्सव सुरू होता ,मात्र संध्याकाळी तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला तसेच गारपीटही झाल्याने संपूर्ण धान्य भिजले. बाहेर गावाहून आलेल्या शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे हा महोत्सव एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता ,परंतू आज पुन्हा काल सारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक विजांच्या कडकडाट झाला आणि जोरात पाऊस बरसला. शेतकऱ्यांना ,स्टॉल धारकांना सुरक्षित ठिकाणी जाणेही शक्य झाले नाही. गारपीट पासून बचाव होण्यासाठी तेथील लोकांनी डोक्यावर चक्क खुर्ची उलटी करून आधार घेतल्याचे दृश्य दिसून आले. वादळाने मंडप ,खुर्च्या आणि बॅनर आदी वस्तू लांबपर्यंत उडाल्या ,त्यामुळे सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत एकच तारांबळ उडाली होती. कृषी अधिकारी ,आयोजन समितीच्या सदस्यांनी घटनास्थळी येऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. कृषी विभागाने महोत्सवाचे आयोजन तर केले. मात्र पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. या धान्य महोत्सवात थेट शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्रीसाठी बळीराजा शुक्रवारी महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून दाखल झाला .बहुतांश शेतकऱ्यांचे आणलेले धान्य पूर्णतः भिजून गेले .अवकाळी पावसाने सर्वत्र प्रचंड नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या