मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सध्या जिल्ह्यात चोऱ्या , खून आदींचे सत्र सुरूच आहे.गुन्हेगारी काही कमी होत नसल्याचे चित्र आहे.भुसावळ शहरातील शिरपूर कन्हाळा रस्त्यावरील वल्डस्कुलचे बाजुला सार्वजनिक जागी काही व्यक्तीकडे बनावट सोने असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्या लुबाडणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. परिसरातील ग्राहकांना लुबाडण्याचा प्रयत्न सुरू होता.त्या संबंधित त्या व्यक्तीस सोने हे खरे असल्याचे भासवून फसवणूक करतांना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना माहिती मिळाल्यानुसार पथक तयार करून घटनास्थळी रवाना केले. पथक (दि. २९), रोजी सव्वापाच वाजता शिरपुर कन्हाळा रोडवरील वल्डस्कुलचे बाजुला रस्त्यावर सार्वजनिक जागी सापळा रचून होते. काही वेळेनंतर संबंधित आरोपी किसनलाल दौलतराम बागरी (वय ३६) रा. बल्लुर ता. जि. सिरोही राजस्थान, बाबुलाल ओबाराम बागरी (वय ४२) रा. लक्ष्मी नगर बिबलसर ता. जि. जालोद राजस्थान हे स्वतःच्या लाभासाठी त्यांच्याजवळील सोन्याचे दागीने (मण्याची माळ हे नकली असल्याचे माहित असून सुध्दा स्वतःच्या ताब्यात बाळगून अप्रामाणिकपणे ते खरे असल्याचे भासवून भुसावळ येथील एकास विक्री करून त्यांची फसवणूक करतांना लक्षात आले. पोलिस नाईक रमण सुरळकर यांचे फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज पाटील, पोना. यासिन पिंजारी अशांनी केली.पुढील तपास पोलीस करीत आहेत.