मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
जळगाव/ कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह:- गेल्या आठवड्यात बिबट्या , निलगायी आणि कोल्हे हे नागरी वस्तीकडे वळलेले दिसून येत असल्याचे चित्र दिसत आहे. वनविभागाने याकडे लक्ष घालण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. बिबट्याने आज मन्यारखेड्याच्या नजीक तरुणावर हल्ला चढवला.
जळगावपासून नजीकच असलेल्या मन्यारखेडा शिवारात भावासह जवळच्या रानात सरपण गोळा करायला गेलेल्या भावावर दडी मारून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना घडली, मात्र हल्ल्याची चाहूल लागताच गळ्यावर ,गालावर बिबट्याने पंजे मारताच पूर्ण ताकद एकवटून जिगरबाज तरुणाने बिबट्याला अंगावरूनच थेट बाजूला फेकले. तसेच आरडाओरडा करू लागला. त्यामुळे हादरलेल्य्या बिबट्याने जंगलात जोरात पळ काढला. तरुणाने समयसूचकता आणि चफखलपणा दाखवून मोठे धाडस व साहस दाखविल्याने ‘काळ आला होता, वेळ आली नव्हती’ अशी ही घटना घडली .
आज सकाळी भुसावळ जवळील निमगाव येथे सुद्धा एक बिबट्या गावात शिरला Very कोरड्या विहिरीत जाऊन पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना ताजी असतानाच मन्यारखेडा. शिवारात बिबट्याने हल्ला केला.
मदन सुखदेव अहिरे (वय २५, रा. मन्यारखेडा ता. जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मन्यारखेडा गावात परिवारासह तो राहतो. त्याचा मोठा भाऊ राजेंद्र सुकदेव अहिरे (वय २८) हा त्याला गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रानात सकाळी ११ वाजता पावसाची उघडीप झाल्याने सरपण गोळा करायला गेला होता. त्यावेळी राजेंद्र हा थोड्या अंतरावर पुढे चालत होता. तर मदन मागे राहून लहान-सहान लाकडे गोळा करीत होता. जवळच त्यावेळी अचानक झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मदनवर हल्ला केला. मात्र हल्ल्याची चाहूल लागताच मदनने बिबट्याला पूर्ण ताकद
लावून बाजूला फेकले. या प्रयत्नांत मदनच्या गळ्यावर व उजव्या कानाल, छातीला बिबट्याने पंजे मारले होते. नखे लागल्याने रक्तबंबाळ झाल्यावरही मदनने हिंमत हारली नाही. त्याने वेळीच आरडाओरडा करून भावाला आवाज दिला. यामुळे बिबट्याने जंगलात धूम ठोकली. भाऊ राजेंद्रने धाव घेत जखमी भाऊ मदनला तात्काळ उचलत नागरिकांच्या मदतीने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार सुरु केले. मदनच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच गर्दी केली . दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यामुळे मन्यारखेडा येथील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. जळगाव वनविभागाने बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी जंगल परिसरात पिंजरे लावावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अन्यथा पशुधन व ग्रामस्थांचा जीव धोक्यात येऊ शकतो असे बोलले जात आहे.