Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमडंपर खरेदी करण्यास सांगून तरुण व्यापाऱ्याला तब्बल ६२ लाखांत फसविले...!

डंपर खरेदी करण्यास सांगून तरुण व्यापाऱ्याला तब्बल ६२ लाखांत फसविले…!

जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सध्या जळगाव जिल्ह्यात विविध गुन्ह्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत,त्याचप्रमाणे आमिष दाखवणे व फसवणूकीचे प्रकार अलीकडे खूप होत आहेत.अशीच एक घटना जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. यात दोघांनी तरुण व्यापाऱ्याला बँकेकडून दोन डंपर खरेदी करण्यास सांगून तब्बल ६२ लाख ६२ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन विजय वैद्य आणि विजय वैद्य (दोन्ही रा. सेनापती बापट रोड, मुंबई) असे फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत.

या फसवणूकच्या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, राहूल जयप्रकाश बाविस्कर (वय-३१) रा. टेलिफोन नगर, जळगाव हा तरूण कुटुंबासह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह तो करतो. रोहन विजय वैद्य अणि विजय वैद्य दोन्ही रा. सेनापती बापट रोड, मुंबई हे राहूल बाविस्कर याचे ओळखीचे आहेत. दोघांनी राहूलचा विश्वास संपादन करून बँकेकडून दोन डंपर खेरी करण्यास सांगितले. चांगल्या प्रमाणात विश्वास संपादन करून फसवणुकीचे प्रकार जळगाव शहर व जिल्ह्यात होत आहेत.. राहूल बाविस्करने बँकेतून कर्ज काढून सन २०१८ मध्ये डंपर खरेदी केले. त्यानंतर डंपरचे मासिक हप्ते ६० हजार रूपये करारनामा नुसार देण्याचे दोघांनी ठरविले,असे असताना त्यांनी मासिक हप्ते थकवले. शिवाय राहूलकडून १० लाख रूपये घेतले. असे एकूण ६२ लाख ६२ हजारांची फसवणूक केली. हा भयानक प्रकार लक्षात आल्यानंतर राहूल बाविस्कर याने मंगळवारी २ मे रोजी सायंकाळी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. आपण फसवले गेलो आहोत हे त्याला कळले. तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रोहन विजय वैद्य अणि विजय वैद्य दोन्ही रा. सेनापती बापट रोड, मुंबई यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रविंद्र सोनार करीत आहे.
गोड बोलून ,विश्वास संपादन करून समोरच्याला गंडविले जाते,लोकांनी सावध रहावे ,असे आवाहन आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या