Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासंतनगरी शेगावचा सुप्रसिद्ध आनंदसागर प्रकल्प पुन्हा सुरू, भक्त-पर्यटकांमध्ये आनंद....!

संतनगरी शेगावचा सुप्रसिद्ध आनंदसागर प्रकल्प पुन्हा सुरू, भक्त-पर्यटकांमध्ये आनंद….!

शेगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- शेगाव-श्री संत गजानन महाराज यांची समाधी स्थळ संत नगरी शेगाव येथील आनंद सागर हा महत्वकांक्षी प्रकल्प महाराष्ट्राची कन्याकुमारी म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपासून आनंद सागर हा प्रकल्प बंद अवस्थेत होता. अखेर आनंद सागर प्रकल्प सुरू करण्यात आल्याची माहिती श्री संत गजानन महाराज संस्थांच्यावतीने देण्यात आली आहे.

आनंद सागर हे तीर्थक्षेत्र शेगाव येथील मनोहारी उद्यान व ध्यान केंद्र आहे,हे केंद्र श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे सुमारे ३५० एकर जमिनीवर शेगाव येथे येणाऱ्या भक्तांसाठी अध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेत, तसेच मत्सालय,तलाव ,ध्यानकेंद्र,फाउंटन रेल्वे गाडी, झुलता पूल तसेच तिथे ध्यान मंदिर आहे.प्रयत्नाचे हे जबरदस्त आकर्षण केंद्र असून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. पर्यटनाचा असा योग जोडून आलेला असताना काही कारणाने आनंद सागर प्रकल्प बंद होता. आनंद सागर मुळे शेगाव शहर जगाच्या नकाशावर आले. यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळाली पण काही कारणास्तव शेगाव संस्थानने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आता आनंद सागर सुरू होणार असल्याची माहिती संस्थानने अधिकृत दिली आहे.संत गजानन संस्थानकडून उभारण्यात आलेले आनंद सागर अनेक वर्ष पासून बंद होते. आनंद सागर सुरू होण्याची देशभरातील पर्यटक वाट पाहत होते.
२००१या वर्षी धार्मिक ,अध्यात्मिक आणि पर्यटक स्थळ म्हणून आनंद सागरची निर्मिती करण्यात आली आहे .आनंद सागर पुन्हा सुरू करावे अशी मागणी भाविक सातत्याने करत होते. दरम्यान आता प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येत आहे अशी माहिती श्री गजानन श्री संत गजानन महाराज संस्थेतर्फे देण्यात आली आहे.तरी भाविक व पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन संस्थांतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या