Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावमारवाड येथे चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू

मारवाड येथे चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू

अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर तालुक्यातील मारवड येथील 30 वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली आहे. याबाबत गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मारवड येथील महारु नामदेव पाटील (वय 30) हा तरुण मिस्तरी काम करून उदरनिर्वाह करीत होता. घरची परिस्थिती हलाखीची होती. काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बाजारपेठेत चक्कर येवून खाली पडला व छाती चोळू लागला. त्यास अधिक त्रास होऊ लागल्याने तात्काळ वाहनाने अमळनेर येथील खासगी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तात्काळ तपासले असता त्यास मृत घोषित केले. त्याचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.
अक्षय पाटील याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महारू पाटील हा कष्टाळू तरुण मिस्तरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई असा मोठा परिवार असून मारवड गावात शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या