Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याअत्यंत भयानक...! खरगोन- इंदौर बस पुलावरून नदीत कोसळली; १५ जण मृत्युमुखी

अत्यंत भयानक…! खरगोन- इंदौर बस पुलावरून नदीत कोसळली; १५ जण मृत्युमुखी

जळगाव/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- बसेसचे अपघात वाढलेले दिसून येत आहेत. महाराष्ट्रसह मध्य प्रदेशात खरगोनहून इंदूरला जाणारी खासगी बस पुलावरून नदीत कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू ओढवला आहे.तर २५ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ऊण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दसंगा पुलावर झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५ जण जखमी झाले आहेत.घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, बस पुलावरून खाली पडल्यानंतर मोठा आवाज झाला. तो आवाज ऐकून आसपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही क्षणातच घटना परिसरात खूप गर्दी झाली आणि एकच हंबरडा फुटला..जखमी जोरजोराने रडत ,ओरडत असतानाचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. गावकऱ्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि अपघाताची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच एसपी, जिल्हाधिकारी आणि आमदारही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, या अपघातील मृतांच्या नातेवाईकांना मध्यप्रदेश सरकारने चार लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तसेच, जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.आज या बसच्या अपघाताबद्दल आणि मृत्युमुखी प्रवाशीबद्दल खूप दुःख व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या