Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याकर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची निर्मिती- डॉ येळेगावकर

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची निर्मिती- डॉ येळेगावकर

सोलापूर/ जिल्हा प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- रयत शिक्षण संस्थेतर्फे कर्मवीर पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्यामुळे वंचित आणि उपेक्षित समाजातील मुला मुलींना शिक्षण मिळाले. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यांची कमवा व शिका ही योजना जगभरातील विद्यार्थ्यांनी स्वीकारली. त्यातून श्रमाला प्रतिष्ठा मिळाली. हे त्यांचे सामाजिक योगदान उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले.

सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्थेच्यावतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 64 व्या पुण्यतिथीनिमित्त कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर आयोजित अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मनपा उपायुक्त मच्छिंद्र घोलप होते. याप्रसंगी आनंददादा चंदनशिवे, केतन शहा, कर सल्लागार धीरज जवळकर, प्राचार्य डॉ. सुरेश पवार, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर, उद्योजक शशिकांत पाटील, इंद्रमल जैन, हर्षल कोठारी, गणेश पुजारी, डॉ.अस्मिता बालगावकर उपस्थित होते. पुढे ते म्हणाले की, कर्मवीरांच्या स्वावलंबी शिक्षण प्रणालीमुळे बहुजन समाजातील विद्यार्थी विद्यार्थ्यांना शहाणपण प्राप्त झाले. त्यांनी प्रशासकीय सेवेत उच्च अधिकार पदे भूषविली,हीच खऱ्या अर्थाने कर्मवीरांच्या कार्याची पोहोच पावती आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत नागणे यांनी केले. यावेळी मधुकर श्रीवास्तव, चंद्रकांत घुले, राहुल कांबळे, रामचंद्र हक्के, भारत केत, काशीबाई ढेरे, डॉ. विजय रेवजे, डॉ. मोहन चव्हाण, भक्तराज जाधव, अमर देशमुख, प्रतिभा भोसले, कल्पना सर्वगोड, मीनाक्षी बिराजदार आदी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी किशोर मार्तंडे महावीर आळंदकर, सुनीता पाटील, नियाज शेख यांनी प्रयत्न केले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांच्याजवळील सोन्याचे दागिने मोडून बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. पाटील कुटुंबीयांच्या त्यागातूनच रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली आहे, असे मत मनपा उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या