Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमपिकअप मंदिराच्या ओट्यावर धडकली;दोघांचे चारही पाय जागेवरच तुटून पडले...!

पिकअप मंदिराच्या ओट्यावर धडकली;दोघांचे चारही पाय जागेवरच तुटून पडले…!

पाचोरा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  येथील महाराणा प्रताप चौकात भल्या पहाटे मुंबईकडून येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने मंदिराच्या ओट्यावर बसलेल्यांना जोरात धडक दिल्याने या अपघातात चौघे जखमी झाले आहेत.या दुर्दैवी घटनेत दोन व्यक्तीचे चारही पाय तुटून वेगळे झालेत.

मुंबई येथून बुलढाणा येथे सफरचंद, केव्ही, मोसंबीने भरलेली महेंद्र कंपनीची पिकअप मालवाहतूक गाडीने आज दि. 12 मे रोजी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास मुंबईकडून येत असतांना चौकातील दत्त मंदिराच्या ओट्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की,गाडीचे बोनेट तुटले आणि ओट्यावर बसलेल्या दोघांच्या चारही पायाचे तुकडे होवून जागीच पडले. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ अॅम्ब्युलन्स चालक बबलू पाटील यांना कॉल करून जखमींना पुढील औषध उपचारासाठी विघ्नहर्ता मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले,तर गाडी चालक यांच्यावर संतप्त जमावाने रोष व्यक्त करत असतांना काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पो कॉ.योगेश पाटील, राहुल बेहरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश भोसले, प्रा. सी.एन चौधरी यांनी जमाव शांत करण्यासाठी प्रयत्न केला. परिस्थिती चिघळली होती,जमाव खूप संतप्त झालेला होता.
या अपघातात विनोद बारकु पाटील (35) कुंदन सुनिलसिंग परदेशी (17) रा. पुनगाव तर अमोल वाघ (26)  हा पाचोरा येथील आहे तर वसंत भाईदास पाटील (42) हे जखमी झाले आहेत तर विनोद पाटील व वसंत पाटील यांचे दोघे पायाचे जागेवरच तुकडे पडले होते.

लग्नासाठी आले आणि पाय गमवून बसले

आता आयुष्यभरासाठी त्यांचे पाय निकामी झाले असून परिसरात एकच दुःख व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान वसंत पाटील हे आज सकाळी एका खासगी लक्झरी ने पाचोरा येथे आले होते चौकात उतरले आणि चहा घेतल्यावर पत्ता विचारत अमोल वाघ यास उठून स्वतः नातेवाईक यांची वाट बघत असतांनाच अचानक गाडीने त्यांचे दोघे पाय उडवले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या