जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- दि.14 रविवार रोजी जळगाव येथे कार्यरत असणारी मातृभूमी कमांडो फोर्सच्या कर्मचारी यांना ड्युटी ला जात असतांना डी. एस.पी.चौक जळगाव या ठिकाणी पर्स सापडले , त्यात पैसे व ओरिजनल पेनकार्ड , lic कागदपत्रे , एटीएम कार्ड , ड्रायव्हिंग लायसन , आधारकार्ड होते . मातृभूमी कमांडो फोर्सचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख व केशवस्मुर्ती प्रतिष्ठान समतोल प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री.प्रदिप पाटील , व जळगाव कमांडो सिनियर अधिकारी दिपक महाले , कमांडो पुथ्वीराज सूर्यवंशी यांनी कुठला ही मोह न करता त्या कागदपत्रांची छाननी करून संपर्क नंबर शोधून पर्स हरविलेल्या व्यक्तीला फोन करून रामानंद नगर पोलीस स्टेशनला बोलवून घेत पोलीस कर्मचारी यांच्या साक्षीने पर्स पैसे सर्व कागदपत्रे त्यांना परत केले .
आज भौतिक सुखाचा मागे जग धावत असतांना अनेकदा अनैतिक तथा भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब होतांना दिसतो .मात्र जळगाव येथील मातृभूमी कमांडो फोर्स चे जवान यांनी ज्यांचे पर्स हरविले होते त्यांचा संपर्क नंबर शोधून मनोज पाचपांडे असोदाकर यांचे पर्स , पैसे व सर्व कागदपत्रे परत केले.
प्रदिप पाटील मातृभूमी कमांडो फोर्स चे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख व आपदा मित्र आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक महाले , पुथ्वीराज सूर्यवंशी जवान व आपदा मित्र हे ड्युट्या करीत असतात.ज्या ज्या वेळेस डिपार्टमेंट ला जवानांची कमी पडते , त्या त्या वेळेस mcf फोर्स चे जवान उभे राहून सेवा देण्याचे कार्य करीत आहेत . आज प्रशासकीय तसेच पोलीस डिपार्टमेंट च्या खांद्याला खांदा लावून या फोर्स चे जवान कार्य करीत आहेत . कोरोना मध्ये ही जीवाची पर्वा न करता सेवा दिली आहे , चोवीस तास तत्पर राहून ऊन ,वारा , पाऊस खात , इलेक्शन ड्युटी असो , यात्रा उत्सव , जयंती वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी आपली ड्युटी बजावत असतात. असे अनेक वेळेस त्यांनी हरविलेल्या वस्तू परत केलेल्या आहेत , अनेक वेळेस अपघाती लोकांना वाचवण्याचे देवदूताचे कार्य त्यांनी केले आहे.
त्यांनी पैसे व पर्स परत करून परत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे , त्यांच्या या केलेल्या प्रामाणिकपणेबद्दल त्या जवानांचे पोलीस डिपार्टमेंट कडून चोहीकडे कौतुक होत आहे .