Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याRBI चा निर्णय, २००० च्या नोटा बंद होणार; २३ मे ते ३०...

RBI चा निर्णय, २००० च्या नोटा बंद होणार; २३ मे ते ३० सप्टेंबर पर्यन्त बँकेत जमा करता येणार…..!

दिल्ली/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पुन्हा एकदा नोट बंदी सुरू झाली आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इतर बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे,असा सल्ला दिला आहे. इथून आता पुढे २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद होणार आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे आरबीआयने म्हटले आहे.

ग्राहकांना २ हजार रुपयांच्या नोटा देणं तातडीने थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत. ‘क्लिन नोट पॉलिसी’च्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. भारतीय रिजर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, असे असले तरी २००० रुपयांची लगेचच बंद होणार नाही किंवा चलनातून बाद होणार नाही. मात्र इतर बँकांना २००० हजारांची नोट ग्राहकांना देऊ नका, अशी सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेली आहे. या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असणार आहे. एका व्यक्तीला एका वेळेस फक्त २० हजार रुपयांच्या नोटा बदली करता येणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या