चोपडा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- चोपडा तालुक्यातील अडावद येथून एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. त्यांच्यावर अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले असल्याचे हे द्योतक आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र पाटील, दीपक शिंदे, अविनाश देवरे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे यांनी अडावद शहरात शुक्रवारी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास एक व्यक्ती अवैध पिस्टलची तस्करी करणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने अडावद येथे पोहोचले,आणि बारकाईने चौकशी केली.
या पथकाने अडावद शहरातील बस स्थानकावर सापळा रचून वाडा-यावल बस क्र. एमएच २० बीएल २२७७ मध्ये बसलेल्या संशयित रमेश घुमरसिंग भिलाला, वय २८, रा. बजारखोद्रा ता. जि. खरगोन मध्यप्रदेश ह.मु. शिंदी ता. भुसावळ यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडून २५ हजार रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा कटटा आणि १ हजार किमतीचा एक जिवंत काडतूस जप्त केला. संशयित आरोपी व मुददेमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी अडावद पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.