भुसावळ/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ खुणांच्या आणि घरफोडीच्या घटनेत जिल्ह्यात वाढ झाली असून भुसावळ शहरातील जळगांव हायवेलगत बालाजी लॉन पाठीमागे साने गुरुजीनगर ,शकुन इस्टेट,राका काँट्रॅकशन,ध्वज अपार्टमेंटमधील दुसरा मजल्यावर एकाने दोन जणांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली.या घटनेने भुसावळ शहर हादरले आहे.
दरम्यान साने गुरुजी नगर परिसरात सन्नाटा पसरला आहे.
पहाटे चार वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी हेमंत कुमार भूषण (वय ३२) हा रेल्वे कर्मचारी आहे.याने कौटुंबिक वादातून आई सुशिलादेवी (वय ६०) आणि पत्नी आराध्य हेमंत कुमार (वय २४) या दोघांना लोखंडी तवाने मारहाण करीत निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला, हरिष भोये हे घटनास्थळी पोहचले.तसेच फॉरेन्सिक पथक जळगांव घटनास्थळी पाचारण झाले असून नमूने घेतले आहेत.तर शालक जखमी झाला असून सिव्हिल हॉस्पिटल जळगांव येथे उपचार घेत आहे. संशयित आरोपी हेमंत कुमार भूषण यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची एकच चर्चा परिसरात होत असून अपार्टमेंट समोर बघ्यांची गर्दी दिसून आली.