Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमउधारीच्या कारणावरून एकास मारहाण; गुन्हा दाखल

उधारीच्या कारणावरून एकास मारहाण; गुन्हा दाखल

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव  शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील शाळेच्या प्रांगणात पानटपरीतील सामान उधारीने देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पानटपरी धारकास काही जणांनी बेदम मारहाण केली तर दुचाकीला दगड मारून नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी २१ मे रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश उर्फ भावड्या संतोष राजपूत (वय-२२) रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव हा तरूण पानटपरी चालवून आपला उदरनिर्वाह करतो. २० मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास टपरी बंद करून उमेश राजपूत हा घरी जात होता. पानटपरीतील सामान उधारीने देत नसल्याच्या कारणावरून शारदा शाळेच्या प्रांगणाजवळ किरण चितळे, विजय मराठे, बेंडा बाप्या, आकाश पोदे, पप्पु माचिस, रोहित (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव यांनी शिवीगाळ करून उमेश राजपूत याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली,यातील काहींनी उमेशच्या दुचाकीला दगड मारून नुकसान केले. हा प्रकार घडल्यानंतर उमेश राजपूत याने २१ मे रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे. सध्या गुन्ह्यांच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या