Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यादक्षिण सोलापूर तालुक्यातील काही ठिकाणी सौम्य भूकंपाची नोंद

दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही ठिकाणी सौम्य भूकंपाची नोंद

नागरिकांना घाबरून न जाण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..

सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही ठिकाणच्या परिसरात १.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे.हा भूकंप खूप कमी तीव्रतेचा असल्याने कोणतीही जीवित व वित्त हानी झालेली नाही.तरी नागरिकांनी अफवांना बळी न पडता कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये,असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तुषार ठोंबरे यांनी केले आहे.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शमा पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव, होटगी स्टेशन, मंद्रुप, हिपळे, फताटेवाडी, औज आहेरवाडी, तिल्हेहाळ,कणबस व बोरूळ या परिसरामध्ये आज दि. २९ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सौम्य आवाज ऐकू आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची बाब दक्षिणचे तहसिलदार राजशेखर लिंबारे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निदर्शनास आणून दिली.सदर बाबीची पडताळणी करिता,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी,नवी दिल्ली यांच्याकडे शहानिशा केली असता, सोलापूर शहरातील वालचंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी परिसरातील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या भूकंप मापक स्टेशनमध्ये १.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली असल्याचे सांगितले.त री जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, उपरोक्त स्केलचा भूकंप खूप कमी तीव्रतेचा असल्याने कोणतीही जीवित व वित्त हानी झालेली नाही. तरी नागरिकांनी अफवांना बळी न पडता कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये,असे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या