Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावपारंपरिक पध्दतीने वटपौर्णिमा उत्साहात

पारंपरिक पध्दतीने वटपौर्णिमा उत्साहात

जळगाव/नेहा वाघुळदे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरात पारंपारिक पद्धतीने वटपौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. कॉलनी कॉलनीत ,विविध मंदिर परिसरात तसेच घराच्या अंगणात वडाचे पूजन करण्यात आले. पती-पत्नीचे नाते सात जन्म टिकावे यासाठी वटपौर्णिमेला सर्वच सुवासिनींनी वडाची पूजा केली आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. सनातन धर्मात विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाला वटसावित्री व्रत करतात. या दिवशी, महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी, दिवसभर निर्जल उपवास करतात. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येतो.” सात जन्म हाच पती मिळू दे…” म्हणून प्रार्थनाही करतात. वट सावित्री पौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची आणि भगवान विष्णूची पूजा करतात. असे मानले जाते की, या दिवशी पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात.

वट सावित्री पौर्णिमा व्रत
हिंदू धर्म मान्यतेनुसार,या वर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा 03 जून रोजी सकाळी 11:16 वाजता सुरू झाली.. आणि 04 जून रोजी सकाळी 09:11 वाजता समाप्त होणार आहे.. अशा परिस्थितीत वट पौर्णिमेचं व्रत शनिवार, 03 जून 2023 रोजी म्हणजेच आज पाळण्यात आले.

वट सावित्री पौर्णिमा व्रत 2023 शुभ योग

हिंदू पंचांगात सांगितले आहे की, वट पौर्णिमा व्रताच्या दिवशी तीन अतिशय शुभ संयोग निर्माण होत आहेत. या दिवशी अनुराधा नक्षत्र तयार होईल जे सकाळी 06.16 ते पूर्ण रात्रीपर्यंत असते. तसेच, या दिवशी शिव आणि सिद्ध योग तयार होत आहेत. शिवयोग दुपारी 02.48 पर्यंत चालले ,आणि त्यानंतर सिद्धयोग सुरू झाला.

वट पौर्णिमा आणि अमावस्या व्रत यात विशेष फरक नाही. या शुभ दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि झाडाला धागा बांधून त्या भोवती फेरे घेतात.
असे मानले जाते की, वटवृक्षात भगवान विष्णू वास करतात आणि त्यांची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात. इतकंच नव्हे तर, संतानप्राप्तीसाठीही अनेक महिला वटवृक्षाची पूजा करतात. यंदा वटपौर्णिमा उत्साहात साजरी झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या