Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमलाचखोर निरीक्षक, रोखपालास कोर्टाने सुनावली शिक्षा

लाचखोर निरीक्षक, रोखपालास कोर्टाने सुनावली शिक्षा

धुळे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- धुळे ट्रकचालकाकडून त्याची गाडी नंदूरबार जिल्ह्यातील गव्हाळी चेक पोस्टमार्गे गुजरात राज्यात मार्गस्थ करण्यासाठी प्रादेशिक निरीक्षक, रोखपालास परिवहन विभागाच्या तत्कालीन मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक रोखपालाने चार हजारांची लाच स्वीकारली होती. या प्रकरणात दोघांना दोन वर्षे कैद व पाच हजाराच्या दंडाची शिक्षा शहादा न्यायालयाने सुनावली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गव्हाळी चेक पोस्टवर २४ फेब्रुवारी २०१२ रोजी निरीक्षक सूर्यभान रेवजी झोडगे आणि सहाय्यक रोखपाल वेलजी नहाडिया मावची यांनी तक्रारदार ट्रकचालकाकडून गव्हाळी चेकपोस्टवर ट्रक गुजरात राज्यात नेण्यासाठी चार हजार रुपये लाच स्वीकारली होती. याबाबतच्या यशस्वी सापळा कारवाईनंतर अक्कलकुवा पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची शहादा न्यायालयात सुनावणी होऊन न्यायाधीशांनी प्रकरणातील संशयितांना कारावासाची शिक्षेसह पाच हजाराचा दंड ठोठावला आहे.या निर्णयामुळे आरटीओ विभागात चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या