Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावगुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव-इयत्ता दहावी व बारावीत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत जय दुर्गा प्राथमिक माध्यमिक आणि कै. कौतिक चावदास महाजन उच्च विद्यालय, मेहरूण येथील 10 वीचा 92.30 टक्के निकाल तर 12वी चा 95.18 टक्के निकाल लागला आहे.

उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत मेहरूण परिसरातील जय दुर्गा प्राथमिक माध्यमिक व कै.कौतिक चावदास महाजन उच्च विद्यालय ,मेहरूणचा निकाल लागला आहे. गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन व जय दुर्गा भवानी क्रीडा मंडळाचे सचिव ललित धांडे यांच्या हस्ते करण्यात आला.इयत्ता 10 वी मध्ये प्रथम- किरण रतन राठोड (89.40 %), व कोमल संजय सोनवणे (89.40%) द्वितीय- खुशी निंबानाथ मोरे (86.80 %), तृतीय- वैष्णवी विकास पवार (86.40 %), तसेच इयत्ता 12 वी मध्ये प्रथम अंकिता लालू चौधरी (73.50%) द्वितीय- दिव्या सुरेश चौधरी (72.00%) तृतीय- बुद्धप्रणाली किशोर नन्नवरे (70.83%) इयत्ता 12वी खाजगी विद्यार्थी ( 17नंबर) प्रथम- लक्ष्मी संजय तागवले (77.50%) द्वितीय – मयूर सुरेश देवरे (75.83%) तृतीय – अभिजीत प्रदीप कोल्हे (71.67%) गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येऊन अभिनंदन करण्यात आले.या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या