Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याकन्नड घाटात दोन ट्रकच्या अपघातात चालकाचा मृत्यू

कन्नड घाटात दोन ट्रकच्या अपघातात चालकाचा मृत्यू

चाळीसगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- कन्नडकडून चाळीसगावकडे लोखंडी पाईप घेऊन येणाऱ्या ट्रकला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने ट्रकमधील लोखंडी पाईप ट्रकच्या कॅबीनमध्ये घुसून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे जणही यात अडकले होते. या घटनेत दोघांना वाचवण्यात पोलीसांना यश आले आहे. हा अपघात कन्नड घाटात मेणबत्ती पॉईंटजवळ आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास घडला.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष कुमार पांढरे (42) रा. बिदर,कर्नाटक हा जिंदाल कंपनीचे दीडशे पाईप ट्रकमध्ये भरून औरंगाबादहून धुळ्याकडे येत होता. त्याच्यासमवेत अन्य दोघे जण होते. लोखंडी पाईप भरलेला हा ट्रक घाट उतरत असतांना घाटातील मेणबत्ती पॉइंटजवळ समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने धडक दिली. त्यात ट्रकमधील लोखंडी पाईप केबीनमध्ये घुसल्याने त्यात दाबला जावून संतोष पांढरे याचा जागीच मृत्यू झाला. तर या पाईपांमध्ये ट्रकमधील अन्य दोघे जण अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाचे उपनिरीक्षक भागवत पाटील, हवालदार विरेद्र शिसोदे यांच्यासह चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे नंदू परदेशी, राहूल जाधव यांनी धाव घेत महामार्गच्या क्रेनद्वारे या जखमींना ट्रकमधून बाहेर काढून रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे दोघांचे प्राण वाचले. भयंकर आणि अंगावर थरकाप उडवणाऱ्या या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या