Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याबिपरजॉय ' चक्रीवादळाचा धोका...!राज्यांना सतर्कतेचा इशारा; २४ तासात पाऊस बरसबार

बिपरजॉय ‘ चक्रीवादळाचा धोका…!राज्यांना सतर्कतेचा इशारा; २४ तासात पाऊस बरसबार

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबई-पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळा धोका निर्माण झाला आहे असे हवामान खात्याने म्हटले आहे. बांगलादेशने या नव्या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव दिलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरुच आहे. अशामध्ये सर्वांना प्रतीक्षा लागली ती म्हणजे मान्सूनची. मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर आता हवामानात बदल झाल्याने अरबी समुद्रात बिपरजॉय नावाचं चक्रीवादळ तयार झालं आहे. या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ असे नाव देण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात खोल दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचे रूपांतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळात झाले. पुढील काही तासांत हे वादळ हळूहळू तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर व्यतिरिक्त कोकणातील किनारपट्टी भागात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडू शकतो,असे हवामान खात्याने म्हटले आहे.
नाव कसे देण्यात आले?
बांगलादेशने या नव्या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव दिलं आहे. जागतिक हवामान संघटनेच्या मते, हवामानाचा अंदाज वर्तविणारे गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येकउष्णकटिबंधीय या चक्रीवादळाला एक नाव देतात. सर्वसाधारणपणे, उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना प्रादेशिक स्तरावरील नियमांनुसार नावे दिली जातात. हिंद महासागर क्षेत्रासाठी, २००४ मध्ये चक्रीवादळांचे नाव देण्याच्या सूत्रावर सहमती झाली. हे चक्रीवादळ ८,९ आणि १० जूनला महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागांत धडकणार आहे. कोकण, गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर ८ ते १० जून दरम्यान समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे त्यामुळे या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या