Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याउपासनी परिवाराचे समाजाभिमुख कार्याबद्दल कौतुक...!

उपासनी परिवाराचे समाजाभिमुख कार्याबद्दल कौतुक…!

नाशिक/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जीवन जगत असताना सामाजिक आत्मभान व जाणीव ठेवत सहकार्याची भावना सर्वांनीच दाखवली पाहिजे ‘ अशी भावना क्रांतिकारी विचारांनी समाजासमोर आदर्श निर्माण करणारे पर्यावरण प्रेमी व सेवा भावी व्यक्तिमत्त्व महेश उर्फ अप्पा उपासनी यांनी व्यक्त केल्यात. विवाह वर्धापनदिन निमित्ताने एक सामान्य कुटुंबातील सदस्य म्हणून फुल ना फुलांची पाकळी खारुताई वाटा प्रमाणे आपल्या आनंददायी क्षणात कुणाचे तरी दुःख, वेदना,पीडा, हलक्या व्हावे म्हणून अन्न पाणी ची मदत मुके ,विकलांग, आजारी, दृष्टी हीन लोकांना सहकार्य करत राहावे असे त्यांनी सांगितले. बेजुबा जीव म्हणजेच श्वान की जो बिचारा संपूर्णपणे दृष्टी हीन आहे असे अनेक जीव पांडव लेणीजवळील ” शरण ” ह्या संस्थामध्ये भरती झाले आहेत,त्यांना सेवा प्रदान म्हणून दोन गोण्या तांदूळ सौ. उमामहेश उपासनी परिवारकडून खाऊच्या स्वरुपात देण्यात आले. खरे तर अशी मदत जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा ती देण्यासाठीचा आमचा प्रांजळ प्रयत्न असतो ,असेही श्री.उपासनी यांनी सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्यक आहे.सकारात्मक जीवन जगून गोरगरिबांच्या मदतीसाठी दातृत्व दाखवावे असे सौ.उमा उपासनी आणि छत्रपती शिवराय यांची भूमिका निभावणारे प्रसिद्ध कलावंत महेश उपासनी यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक साक्षी दुबे, सेवक कोठावदे , शिवाजी भाऊ उपस्थित होते.नेहमीच अभिनव उपक्रम ते राबवित असतात.त्यांचे अनेकांनी कौतूक केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या