Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याभावसार समाजाची कुलदेवता हिंगुलांबिका देवीची प्राचीन मूर्ती सोलापूरहून धुळ्याच्या राजवाडे केंद्रात दाखल

भावसार समाजाची कुलदेवता हिंगुलांबिका देवीची प्राचीन मूर्ती सोलापूरहून धुळ्याच्या राजवाडे केंद्रात दाखल

धुळे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापूर येथील बाहुमार क्षत्रिय समाज ट्रस्टचे अर्थात संपूर्ण भावसार समाजाची कुलदेवता हिंगुलांबिका देवी येथील इ. वि. का. राजवाडे संशोधन मंडळाला सदर ट्रस्टने दिली आहे. सदर मूर्ती विशेष वाहनातून सोलापूरहून धुळे येथे सोमवारीआणण्यात आली. बाहुसार क्षत्रिय समाज ट्रस्टचे सोलापूर येथील गणेश पेठेत श्री हिंगुलांबिका देवी देवालय आहे. या देवालयास आता १२६ वर्षे पूर्ण झाली आहेत. गेली १२५ वर्षे श्री. भगवतीची नैमित्तिक अभिषेक पूजा आणि अन्य पोडषोपचार पूजा अर्चामुळे श्री हिंगुलांबिका देवी मूर्तीची खूप झीज झाली आहे. त्यामुळे नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा निर्णय ट्रस्टने घेतला.

जुनी मूर्ती विधीपूर्वक काढण्यात येवून ती धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळाला द्यावी असा सल्ला निलेश पाठक गुरुजी यांनी ट्रस्टला दिला होता. यामुळे ट्रस्टचे अध्यक्ष किशोर कटारे यांनी २२ मे २०२३ रोजी पत्रासह प्रतिनिधी मंडळ पाठवून मूर्ती स्वीकारण्याची विनंती राजवाडे मंडळाला केली होती.. राजवाडे मंडळाच्या प्रतिसादानंतर खास वाहनातून मूर्ती धुळे येथे आणण्यात आली. राजू भावसार यांच्याकडील कर्मचारी वृंदांच्या सहकार्याने ही मूर्ती राजवाडे मंडळाच्या वस्तू संग्रहालय दालनातील लक्ष्मणराव भिडे कक्षात उत्तराभिमुख स्थितीत विधीवत ठेवण्यात आली. पूजा अर्चा, आरती प्रसादाने हस्तांतरण पूर्ण झाले. यावेळी सोलापूर भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष गोविंदराव हिवारे, धुळ्याचे ऍड. निलेश भालचंद्र पाठक, रविकिरण द. सुगराते सोलापूर,अशोक महिंद्रकर जुळे सोलापूर, रूपेश बेळमकर, बाळासाहेब मिलकर सोलापूर, तसेच राजवाडे मंडळाच्या संचालिका श्रीमती जयश्रीताई शहा, संचालक इंद्रजित शहा, क्युरेटर श्रीपाद नांदेडकर, व्यवस्थापक तथा ज्येष्ठ पत्रकार राधेश्याम वर्मा, वैशाली कुलकर्णी, राजश्री महागे,रेणुका शिंदे, प्रकाश कुलकर्णी, भूषण बर्गे, भावराव माळी, दुर्गेश जोशी, गुलाब भिल आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या