Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईममेडिकल कॉलेजच्या तरुणीची बुलेटवरून पाठलाग व छेडछाड; गुन्हा दाखल

मेडिकल कॉलेजच्या तरुणीची बुलेटवरून पाठलाग व छेडछाड; गुन्हा दाखल

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात विविध गुन्ह्यांच्या घटनेत कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे.पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविण्याची गरज असल्याची अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.शहरात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी होस्टेलवर राहणा-या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. ” मी काय सांगतो ते ऐक,मला सिल्व्हर पॅलेस हॉटेलवर भेटायला ये. .” असे सतत फोन करुन विद्यार्थिनीला एका तरुणाने कमालीचे हैराण केले आहे.

विद्यार्थीनीस त्रास देणा-याने काही एक कारण नसतांना विद्यार्थीनीला तब्बल ३१ वेळा फोन करुन तिचा चक्क बुलेटने पाठलाग करुन तिला त्रास दिला. या घटनेप्रकरणी विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला संबंधित तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथील एक विद्यार्थीनी जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत एका होस्टेलमधे राहण्यास आहे. तिच्या मोबाईलवर रविंद्र खेडकर नावाच्या तरुणाने फोन करुन तिला हॉटेलवर भेटायला येण्यास म्हटले. त्यानंतर रात्री दोन ते साडे तीन वाजेच्या सुमारास ३१ वेळा फोन केल्याने विद्यार्थीनी खूप वैतागली. याशिवाय तिचा बुलेटने पाठलाग करुन विनयभंगाचा प्रकार सुरुच होता. या प्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस कर्मचारी सुनील पाटील हे करीत आहेत. महाविद्यालयीन तरुणींच्या छेडछाड करण्याच्या प्रकारात शहरात वाढ झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या