जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची वैद्यकीय बिले काढण्यासाठी दलालांच्या माध्यमातून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह सेवानिवृत्त शिक्षकांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे केल्या आहेत.पैसे उकळले जात असल्याचा तक्रार या आधी सुद्धा अनेकदा निवेदने देऊन केलेल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित शिक्षक तक्रार निवारण सभेत शिक्षकांनी तक्रारींचा पाढाच वाचला. यावेळी आमदार तांबे यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच अधिकाऱ्यांनादेखील तत्काळ शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.