Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमएरंडोलमधील सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांसह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात...!

एरंडोलमधील सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांसह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात…!

शिक्षकांची बदली रोखण्यासाठी तब्बल ७५ हजारांची लाच मागितली…!
एरंडोलमधील सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांसह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात…!

जळगाव/कार्यकारी संपादक/ तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह;–जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. एरंडोल येथील बहुचर्चित एका संस्थेतून दुसर्‍या संस्थेत होणारी बदली रोखण्यासाठी धनादेशापोटी तब्बल 75 हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या एरंडोलमधील सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांसह मुख्याध्यापक व वरीष्ठ लिपिकाला जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पकडल्याने शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन (वय ५६), मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव (वय-४२), लिपिक नरेंद्र उत्तम वाघ(वय-४४) असे लाचखोरांचे नाव आहे. पवित्र असणाऱ्या शिक्षण क्षेत्रात हे लाचखोरीचे प्रमाण जास्तच आहे.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, ईश्वर जाधव, सचिन चाटे, रवींद्र घुगे, सुनील पाटील आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. आणि अध्यक्ष, मुख्याध्यापक व लिपिक यास रंगेहाथ पकडले आहे. या धडक कारवाईचे एसीबीच्या टीमबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. या आधी सुद्धा या तथाकथित अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांनी असेच कृत्य केले असल्याचे अनेकांनी पोलीस दक्षता प्रतिनिधीस सांगितले. या संस्थेत अनेक प्रकारचे गैरव्यवहार होत असतात. शिक्षकांना दर महिन्याच्या पगाराच्या वेळेस विद्यार्थांनसाठी साहित्य आणण्याच्या कारणास्तव त्यांच्याकडून रोख कॅश घेतल्याशिवाय त्यांचा पगार काढण्यावर सुध्धा ब्रेक लावत असे.त्याला पैसे दिल्याशिवाय शिक्षकांचा पागरच होत नव्हता. त्याला शिक्षक काही जाब विचारण्यास गेले असता त्यांना तो माझ्या डोक्यावर  संचालक मंडळाचा हाथ आहे.आणि त्यांना सुध्धा कल्पना आहे अशी धमकी नेहमी शिक्षकांना तो देत असे. अशाही तक्रारी आहेत असे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. दरम्यान या घटनेने एरंडोल, धरणगाव आणि संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्रकरणी शिक्षण उप संचालक तसेच शिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा शिक्षण प्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या