Thursday, September 18, 2025
police dakshta logo
Homeक्राईममहिलेच्या गळ्यातील सोनसाखळी धुमस्टाईल लांबविली

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी धुमस्टाईल लांबविली

चाळीसगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवर असणाऱ्या अंधशाळेजवळ शतपावली करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून लांबविल्याचा प्रकार १३ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई हॉस्पिटल शेजारी असणाऱ्या बाप्पा पॉईंट जवळ राहणाऱ्या रिटा भूपेंद्र मेहता वय ५७ ह्या घरकाम करतात. त्या सकाळी मॉर्निंग वोक गीता दिनेशभाई पटेल यांच्या सोबत अंधशाळेजवळ करीत असताना अज्ञात दोन जण दुचाकीवर येत रिटा मेहता यांच्या गळ्यातील ६० हजार रुपयांची सोन्याची चैन बळजबरी काढून घेत पोबारा केला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश बेलदार करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या