जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे तरुणाचे बंद घर फोडून घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात बुधवार १४ जून रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महेश नाना सोनार (वय-३८, रा. रायपूर कसंबा ता. जळगाव) हा तरुण आपल्या महेश नाना सोनार (वय ३८, रा. रायपूर – कुसुंबा ता. जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह राहायला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. ७ जून सायंकाळी ६ ते १४ जून सकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान महेश सोनार यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच रोकड असा एकूण ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या जळगाव तालुक्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काजी करीत आहेत.