Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याराजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा आढळला मृतदेह; घातपाताची शक्यता....!

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा आढळला मृतदेह; घातपाताची शक्यता….!

पुणे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज सकाळी एका तरुणीचा मृतदेह सापडला. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने तिची ओळख पटवणे अवघड जात आहे. पोलिसांकडून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. दर्शना दत्तू पवार असे मृत तरुणीचे नाव आहे. ती नुकतीच एमपीएससीची परीक्षा परीक्षा उत्तीर्ण झाली होती. तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाली होती. १५ जून रोजी नन्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये ही तरुणी हरवली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र,आज सकाळी राजगडच्या पायथ्याशी तिचा मृतदेह आढळून आल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात हा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता मृतदेहाच्या जवळ पांढऱ्या रंगाचे बुट, गुलाबी कव्हर असलेला मोबाईल, काळ्या रंगाचा गॉगल, काळ्या रंगाची बॅग, काळ्या निळ्या रंगाचे जर्किन पडलेले सापडले. सापडल्या असून त्यावरून पोलिसांनी तरुणीची ओळख पटवली. संबधित तरुणी ही पुण्यात एमपीएससी करत होती. ती परीक्षा ती पासही झाली होती. मात्र आता या तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या