Thursday, September 18, 2025
police dakshta logo
Homeजळगावआंतरराष्ट्रीय आशिया सॉफ्टबॉल स्पर्धेत वैभव बारी चमकला...

आंतरराष्ट्रीय आशिया सॉफ्टबॉल स्पर्धेत वैभव बारी चमकला…

जळगाव/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- आंतरराष्ट्रीय आशिया सॉफ्टबॉल स्पर्धेत नुकत्याच अनंतपूर येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये निवड झालेल्या वैभव दिलीप बारी झाली याने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.तर दिनांक 23 जून ते 28 जून 2023 दरम्यान कोची जापान येथे या स्पर्धा एशियन सॉफ्टबॉल फेडरेशन यांनी आयोजित केलेल्या आहेत. त्याप्रसंगी निवड झालेल्या वैभव दिलीप बारी याचा सत्कार व अभिनंदन, पुढील भावी वाटचालीसाठी समस्त बारी पंच जळगाव व बारी समाज यांच्यावतीने त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. त्याप्रसंगी समस्त जळगाव बारी पंच संस्थेचे अध्यक्ष विजय बारी, उपाध्यक्ष अरुण बारी,सचिव लतीश बारी खजिनदार बालमुकुंद बारी, उपसचिव महेद्र बारी, उपखजिनदार हर्षल बारी,प्रसिद्धी प्रमुख नितीन बारी,सदस्य राहुल पाटील,राजेंद्र बारी, सागर बारी, आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या