Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedनशिराबादला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा धरणे आंदोलनचा इशारा..!

नशिराबादला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा धरणे आंदोलनचा इशारा..!

ग्रामस्थांचा इशारा : नगर परिषद प्रशासकांना दिले निवेदन

नशिराबाद/प्रतिनिधी सुनील महाजन/पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद नगर परिषदेवर घागर मार्चा काढूनही नशिराबाद येथे अजूनही १० ते १२ दिवसआड पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी ५ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी न.प.चे प्रशासक तथा तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले आहे. नशिराबाद गावात सद्यस्थितीत १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. शेळगाव पाणीपुरवठा योजना वीज बिलाअभावी बंद आहे. शेळगाव बॅरेज येथे पाण्याचा मोठा साठा आहे. शेळगाव पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यास शहराची पाणीटंचाई निवारणार्थ पुरेसा आहे. प्रशासकीय काळात वीजबिलाचे योग्य नियोजन न झाल्याने या योजनेचा वीजपुरवठा महावितरण वीज कंपनीने कायमचा बंद केलेला आहे. त्यामुळेच नशिराबाद येथे नामदेव पाटील यांना निवेदन देताना पंकज महाजन व ग्रामस्थ यांनी शहरात पाणीटंचाई जाणवत असल्याने यावर प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे  देण्यात आलेला आहे. गावात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच घागर मोर्चाही काढण्यात आला. मात्र, अद्याप पाणीटंचाईची स्थिती जैसे थेच असल्याने ग्रामस्थ हतबल झालेले ५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जळगाव तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पाण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. निवेदन देताना पंकज महाजन यांच्यासह सय्यद बरकत अली युसुफ अली, अरुण भोई, देवेंद्र पाटील, अब्दुल रऊफ अब्दुल गनी आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

तहसील दारांचे शिष्टमंडळाला आश्वासन

तहसीलदार नामदेव पाटील यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, २२ जून रोजी रोजी शेळगाव पाणीपुरवठा सुरू करण्यासंदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तातडीची उपाययोजना करण्यात येईल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या