Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeक्राईमवन्यजीव संरक्षण संस्थेचा पुढ़ाकार नाल विक्रीसाठी अशीही 'अश्व' सवारी...

वन्यजीव संरक्षण संस्थेचा पुढ़ाकार नाल विक्रीसाठी अशीही ‘अश्व’ सवारी…

जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- काळ्या घोडयाची नाल ही शुभ मानली जाते, या नालीच्या विक्रीसाठी काळ्या रंगाच्या घोड़यांना असह्य वेदना पोहचविणाऱ्या व्यवसायिकांना वन्यजीव संरक्षण संस्थाने कायद्याच्या कचाट्यात अडकविले आहे. तीनही व्यावसायिकाला नशिराबाद पोलिस ठाण्यात आणले गेले. गोरखधंदा करण्यासाठी खुरांची सातत्याने चाळणी होत असल्याने तीनही घोड्यांना दिवसभर वेदना सहन कराव्या लागत असल्याचा हा संतापजनक प्रकार सुरू असताना वन्यजीव संरक्षण संस्थाने त्याची दखल घेतली. आणि तीन काळ्या रंगाचे घोडे गेल्या तीन दिवसांपासून तरसोद फाटा भागात दिसून येत आहेत. या घोडयासोबत असलेले तीनही घोडयाची नाल विक्री करण्यासाठी रोडवर ठाण मांडून बसतात यांची माहिती कळताच वन्यजीव संरक्षण संस्थांचे देवरे यांनी या तिघांचा शोध सुरू केला होता. काळ्या घोडयाची नाल अंधश्रदाळू नागरिकांच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते, म्हणूनच या नालसाठी तीनशे ते पाचशे रूपये अनेकांनी मोजल्याचे स्पष्ट झाले आहे.विज्ञानयुगात व आधुनिक जगात वावरत असतानाही सुशिक्षित लोक अशा अंधश्रद्धाच्या आहारी धावतच असतात. नाल विक्री झाली की, हा व्यवसायिक घोड्याचा पायाला दुसरी नाल ठोकतो आणि ग्राहक आल्यावर पुन्हा काढतो. त्यामुळे घोड्याच्या खुरांना अनेक छिद्रे पडून जखमा होत आहेत. त्यामुळे त्यांचा पाय लंगडतो आहे.मुका जनावरांना अशा पध्दतीने अमानुष वागणूक दिली जाते आहे.

वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे , रवीद्र फालक, बाळकृष्ण देवरे, जगदीश बैराणी,मयूर वाघुळदे यांनी या व्यवसायिकांचा तरसोद फाटा येथे शोध सुरु केला,तरसोद फाटा येथे घोडयासह उभे असलेल्या तीनही व्यावसायिकांना ताब्यात घेतले आणि त्यांना नशिराबाद पोलिस ठाण्यात आणले. तिघेही व्यावसायिक परप्रांतीय आहेत. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तीनही व्यावसायिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नशिराबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. घराच्या मुख्य दारावर काळया घोडयाची नाल लावल्याने घरावर कोणाची वाईट नजर लागत नाही आणि बरकत कायम राहते, असा अनेकांचा गैरसमज आहे. ज्योतिष जाणकारांच्या माहितीनुसार काळ्या घोडाच्या पायावर शनिचा विशेष प्रभाव असतो. नाल लोखंडापासून बनवलेली असते.लोह शनिचा धातू आहे. शनिचा रंग काळा आहे, आणि आवडता रंग आहे. घोड्याची नाल असल्याने शनिचा प्रकोप संपुष्टात येतो, असा अनेकाचा समज आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या