सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- दक्षिण सोलापूर मंद्रूप -साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंत्रोळी मध्ये सन 2022 -23 मध्ये इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार मंद्रूप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे आणि साने गुरुजी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव परीक्षाळे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाला.
प्रथमता सोलापूर जिल्ह्यातील 25 पोलीस ठाण्यांपैकी मंद्रूप पोलीस ठाण्याला सर्वांगीण कामकाजामध्ये सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून द्वितीय क्रमांक मिळाला, त्याबद्दल मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांचा सत्कार साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भीमराव परीक्षाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंद्रूप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव परीक्षाळे व विचार मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी मधील प्रथम क्रमांक विद्यार्थिनी -सुप्रिया संतोष साळुंखे आणि द्वितीय क्रमांक – मानसी विजय कोळी,तृतीय क्रमांक – वैशाली राजकुमार पुजारी ,उत्तेजनार्थ क्रमांक – अमर रामांना सलगरे,
व तसेच इयत्ता बारावी मधील प्रथम विद्यार्थीनी – आम्रपाली दादासाहेब करपे, द्वितीय क्रमांक- सोनाली नंदकुमार करपे , तृतीय क्रमांक – सानिया रसूल शेख ,चतुर्थ क्रमांक – तनुजा राजशेखर कोळी या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापूसाहेब शेख, सामाजिक कार्यकर्ते राम कोळी, गावचे पोलीस पाटील फिरोज शेख, पत्रकार समीर शेख साहेब, नंदकुमार करपे तसेच ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शेख सर, श्रीमती पठाण ,गजानन कोले, दत्तात्रय शिंदे ,रवींद्र गावित, सोमनाथ साळुंखे, माळाप्पा वडरे, बसवराज चौगुले, शर्मा सुतार, उमाकांत कांबळे यांनी परिश्रम घेतले. प्रथमतः कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय शिंदे यांनी केले तर आभार माळाप्पा वडरे सर यांनी मानले. यावेळी मंद्रूप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाच्या पुस्तकाबरोबर अवांतर वाचनाची पुस्तके वाचावीत, कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नये , व्हाट्सअप वरती चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नये, विद्यार्थ्यांनी महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण क्षेत्रात प्रगती करावी, एमपीएससी यूपीएससीची तयारी करावी, वेळेचे नियोजन करावे, महापुरुषांची पुस्तके वाचून त्यांचा खरा इतिहास जाणून घ्यावा, अंधश्रद्धेला बळी पडू नये, भविष्यात मोठे व्हायचे असेल तर न्यूनगंड बाळगू नये, त्याचबरोबर अभ्यासात सातत्य गरजेचे आहे, व तसेच समाज सुधारक व विचारवंतांची पुस्तके वाचावीत, अशा प्रकारचे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.