सोलापूर/ जिल्हा प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- तेलंगणा राज्याची निर्मिती होऊन जेमतेम काही वर्षांच झाले आहे. आमच्या सरकारच्या काळात तेलंगणाच्या सर्वसामान्यांचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्राच्या दुप्पट केले, महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणा सर्व बाबतीत काही वर्षांपूर्वी अत्यंत पिछाडीवर होता परंतु आमच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या राज्याचा विकासाचा आलेख उंचावत आज अव्वल स्थानावर आणून दिखवले आहे. तेलंगणा सारखाच सर्वांगीण आणि सर्व समावेशक विकास आम्हाला महाराष्ट्रात करायाचा असून आम्हाला इथे नेतृत्व करण्याची संधी महाराष्ट्राच्या जनतेने द्यावी असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यां समोर केले. हैद्राबाद, सिकंदराबाद आणि सायबराबाद हे आय.टी.हब म्हणून जगविख्यात आपल्या नेतृत्वाखाली केले, त्यातील अनेक तरुण सोलापूरातील आहेत. सोलापूराच्या युवकांचा तेलंगणाच्या विकासात खारीचा वाटा आहे, सोलापूरमध्ये आपल्या नेतृत्वाखाली आणि पुढाकाराने सोलापूरात भव्य आय.टी. कंपन्यांची गुंतवणूक करावी, तेलंगणाच्या सर्व सरकारी योजनांचा लाभ सोलापूरातील टेक्सटाईल, वस्त्रोद्योग तथा ईतर उद्योजकांना सोलापूरातच उपलब्ध करून देण्याची मागणी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या बैठकीत मांडली, ह्यावेळी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी तेलंगणाचे अर्थमंत्री टी.हरिष राव, श्रम आणि रोजगार मंत्री मल्ला रेड्डी यांची देखील भेट देऊन त्यांना सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवरचे निवेदन दिले, ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, योगीन गुर्जर, अॅड.दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर आणि विजय कुंदन जाधव उपस्थित होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याशी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी केली सोलापूरच्या विकासाशी निगडीत चर्चा
RELATED ARTICLES