जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्यातील पशुसंवर्धनाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण असे पाऊल महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांचे माध्यमातून उचलण्यात आले आहे. यासंदर्भात परभणीचे आमदार राहुल पाटील आणि नागपूर येथील पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे सदस्य सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या प्रयत्नातून राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक बैठक नुकतीच पुणे येथील आयुक्तालय कार्यालयामध्ये बोलावली.आणि या बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा होऊन नवीन धोरण ठरविण्यात आले. या बैठकीला विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती.