Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याविश्व चषकाचे अखेर वेळापत्रक जाहीर; १० संघ होणार सहभागी

विश्व चषकाचे अखेर वेळापत्रक जाहीर; १० संघ होणार सहभागी

मुंबई/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भारतात खेळवल्या जाणाऱ्या २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आलेले आहे. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा सुरु होण्याच्या १०० दिवस आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडू वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मुंबईतील एस्टर बॉलरूम, सेंट रेजिस, लोअर परेल येथे एका कार्यक्रमात वेळापत्रक जाहीर करण्यात आले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. यजमान संघ भारत ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ५ वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. तर भारत आणि पाकिस्तानमधील पहिला सामना १५ ऑक्टोबर २०२३ ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल. विश्वचषकादरम्यान, ४५ सामन्यांचा समावेश असलेल्या राउंड रॉबिन लीगमध्ये १० संघ एकमेकांशी स्पर्धा करतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळली जाईल. पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. जर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा उपांत्य सामना मुंबईत होईल. या विश्व चषकबद्दल सर्वानाच उत्सुकता लागून आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या