Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय; कुर्बानी न करण्याचे एकमत...!

मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय; कुर्बानी न करण्याचे एकमत…!

मुक्ताईनगर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-मुक्ताईनगर येथील मुस्लिम बांधवांनी एक चांगला विचार अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.येणाऱ्या बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने सर्व हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर राखत बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा एकमताने घेण्यात आला.
निर्णय घेऊन तशा आशयाचे निवेदन मुक्ताईनगरचे तहसिलदार तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी मुक्ताईनगर आणि पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर यांना दिले आहे.याबाबत सविस्तर दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मुक्ताईनगर शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक वर्षानुवर्ष एकता बंधुता सामाजिक सलोख्याने गुण्या गोविंदाने एकत्र राहतात.मुक्ताईनगर शहरात सणासुदीला धार्मिक कारणाने व कोणत्याही प्रकारचे वाद-विवाद किंवा अप्रिय घटना घडलेली नाही.…

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या