उल्हासनगर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबई उपनगरात दरोडे व चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उल्हासनगरमधील एका ज्वेलर्सच्या दुकानात ३ कोटी २० लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. दुकानातून ६ किलो सोन्याचे दागिने चोरण्यात आले आहेत.या घटनेमुळे सराफ व्यवसायिकात खळबळ उडाली आहे. दुकानातील तिजोरी गॅस कटरने फोडण्यात आली असून दुकानाचा वॉचमन, त्याची पत्नी आणि इतरांविरुद्ध उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी अद्यापही फरार आहेत. वॉचमन १५ ते २० दिवसांपासून दुकानात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.पोलीस पुढील शोध घेत आहेत.
उल्हासनगरात ज्वेलर्सच्या दुकानात मोठी चोरी; तब्बल सहा किलो सोने लंपास….!
RELATED ARTICLES

