Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा...

नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा.

नशिराबाद/प्रतिनिधी सुनील महाजन/ पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे सर्वप्रथम संस्थेचे उपाध्यक्ष विनायक वाणी यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली. तद्नंतर पालखी चे पूजन करून पालखी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. या पालखी सोहळ्यास सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभुषा धारण करून विठ्ठलच्या गीतावर नृत्य सादर केलीत तर विठ्ठलच्या वेशभूषेत मंदार वाणी व भूमीत पाटील तर रूक्मिणी वेशभूषा स्वरा चौधरी यांनी साकारली. या दिंडी सोहळ्यात सर्व बाल-गोपाळनी गळ्यात टाळ घालून मृदंगाच्या साहाय्याने संपूर्ण शालेय परिसर विठ्ठलाच्या नामाने भक्तिमय करण्यात आले तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी माऊली माऊली या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष विनायक वाणी, संचालक राजूदादा पाटील, ॲड मोहन देशपांडे, जितेंद्र महाजन, प्राथमिक मुख्याध्यापक प्रविण महाजन, सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन पूजा पाटील, स्वाती अत्तरदे, सुनिता शिवरामे व आशा इसाने यांनी केले.

 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या