Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावपिंप्राळा येथील रथोत्सवात हजारो भाविकांची गर्दी; उत्साह संचारला

पिंप्राळा येथील रथोत्सवात हजारो भाविकांची गर्दी; उत्साह संचारला

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव पिंप्राळा येथील रथोत्सवमुळे भक्तांमध्ये उत्साह संचारल्याचे दृश्य दिसून आले.१४८ वर्षाची परंपरा असलेल्या शहरातील पिंप्राळा गावात आषाढी एकादशीनिमित्त रथ उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. सालाबादाप्रमाणे या वर्षीही हा रथउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी मंत्री ,जेष्ठ नेते सुरेशदादा जैन यांच्या हस्ते मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे, महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, अमर जैन आदी उपस्थित होते. रथोत्सवाच्या मार्गावर हजारो भाविक-भक्त यांनी रथाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

या रथ उत्सवाला ‘हरी नामाच्या गजरात’ आणि विठ्ठल नामाच्या गजरात दुपारी साडेबारा वाजता सुरवात करण्यात आली. परिसरात प्रचंड उत्साह दिसून आला. महिला भजनी मंडळासह पुरुष टाळकरी पावली खेळत तसेच भजनी मंडळाचे लोक हरी नामाच्या गजरात रथाच्या पुढे येत होते.अतिशय शिस्तबद्ध पणे रथाच्या स्वागता साठी सकाळी पावसाने हजेरी लावल्याचे देखील पाहायला मिळाले.मध्येच अधून रथाच्या पुढे पालखी तसेच लेझीम पथक आणि लहान मुलांनी देखील छोटा रथ देखील पहायला मिळाला. बालगोपालांमध्ये उत्साह संचारला होता. १४८ वर्षाची परंपरा असलेला जळगावातील पिंप्राळा नगरीचा श्रीराम रथ उत्सव आहे, आषाढी एकादशीनिमित्त या रथ उत्सवाचे आयोजन करण्यात येते. प्रतिपंढरपूर म्हणून या उसत्वाची ओळख आहे.या रथोत्सवासाठी जळगाव शहर व परिसरातील खेड्यापाड्यातून सुद्धा भाविक आले होते.पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या