Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याशिंदे-फडणवीस सरकारचा ५ जुलैला मंत्रिमंडळ विस्तार....!

शिंदे-फडणवीस सरकारचा ५ जुलैला मंत्रिमंडळ विस्तार….!

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- शिंदे फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण अजूनही बहुचर्चीत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे फडणवीस यांनी यासाठी अनेकवेळा दिल्ली दरबारी हजेरी देखील लावली. उलट शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना भाजपाने डच्चू देण्यास सांगितल्याची चर्चा रंगली होती. पण आता अखेर शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे- फडणवीस सरकारने तब्बल एक वर्ष राज्यमंत्री विना आपला कारभार हाकला आहे. तसेच एका एका मंत्र्याकडे दोन दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. त्याचबरोबर एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्हांचे पालकमंत्री आहे. शिवाय सहा खात्यांचा कारभार देखील ते पाहत आहेत. यावरून विरोधकांनी जोरदार टिका देखील केली होती. बच्चू कडू यांनी तर या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्याची धमक नसल्याचे सांगत घरचा आहेर दिला होता. पण आता अखेर काल गृहमंत्री अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे नक्की झाले आहे. येत्या २ जुलै किंवा ५ जुलैला शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी होणार आहे. राजभवनावर छोटेखानी समारंभात हा विस्तार होणार आहे. यावेळी विस्तारात महिलांनादेखील संधी दिली जाणार आहे. या विस्तारात शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी दिली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.बघूया कोणत्या मंत्र्याला डच्चू मिळतो आणि कोणाला मंत्रिपद मिळते ते…!

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या