Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedदोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी

दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी

सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव सीना येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकी चक्काचूर झाले आहे. दोन्ही दुचाकीचे चालक हे रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले.दोघांनाही सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन्ही रुग्ण शुध्दीवर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या