Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामोबाईल, टीव्ही,इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; केंद्र सरकारचा निर्णय

मोबाईल, टीव्ही,इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; केंद्र सरकारचा निर्णय

दिल्ली/वृत्तसंस्था:- दिल्ली-केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला, ग्राहकांना आता इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे अधिक स्वस्त होणार आहे. काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूवरील जीएसटी कमी करण्याचे सांगितले जात होते. आता सरकारने इलेक्ट्रॉनिक वस्तूवरील जीएसटी कमी केला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानूसार, मोबाईल आणि टीव्ही वरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भावा स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

मोबाईल आणि टीव्ही खरेदीसाठी याआधी 31.3 टक्के जीएसटी भरावा लागत होता. आता सरकारने हा जीएसटी 12 ते 18 टक्कांवर आणला आहे.आधीच्या तुलनेत मोबाइल आणि टीव्ही खरेदीची किंमत 19 टक्कांनी कमी झाली आहे. या नवीन किंमती 1 जूलैपासून लागू होणार आहेत. टीव्ही- मोबाईल झाले इतके स्वस्त केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक वस्तूवरील जीएसटी कमी केला आहे. मोबाईल आणि टीव्हीसाठी भरावा लागणारा जीएसटी कमी झाल्याने ग्राहकांना 27 इंची टीव्ही जो आधी 32,825 रुपयांना मिळत होता, तो आता 29,500 रुपयांना मिळणार आहे. अंदाजित 30,000 रुपयांचा मोबाईल फोन आता 25,000 रुपयांना मिळणार आहे. केंद्र सरकारने जीएसटीला सहा वर्ष पूर्ण झाल्याने 1 जूलै पासून, 27 इंची पर्यंत टीव्ही आणि मोबाईलवरील जीएसटी मध्ये बदल केला आहे. अर्थ मंत्रालयाने ट्विट करुन या वस्तूवरील जीएसटी 31.5 टक्केवरून 12 टक्के करण्यात आल्याची माहिती दिली.

या वस्तूही झाल्या स्वस्त:-

अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूपैकी फ्रिज, वॉशिंग मशीन, गीजर, फॅन, कूलर, एलपीजी स्टोव्ह, मिक्सर, ज्यूसर या वस्तूंवरील जीएसटी 18 टक्यांवरून 12 टक्यांवर करण्यात आला आहे. एलईडी बल्बची किंमतही कमी होणार आहे. वॅक्यूम क्लीनर आणि यूपीएस वरील जीएसटी 28 टक्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या