Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावअमळनेरातील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवले ; गुन्हा दाखल

अमळनेरातील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवले ; गुन्हा दाखल

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे अपहरण, फूस लावून मुलींना पळवून नेणे अशा घटना वाढल्या आहेत. अमळनेर शहरासह तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन गरोदर करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जोशीपुरा येथे राहणारी १४ वर्षाची मुलगी २६ डिसेम्बर २०२२ रोजी सकाळी १० वाजता बिस्कीट पुडा घेण्याच्या नावाने बाहेर पडून आपल्या मैत्रिणीच्या मोबाईल वरून प्रियकर विजय बारकू भिल (वय २०) याला फोन करून त्याच्यासोबत शिरपूर येथे पळून गेली. तेथून ते लखदिरपुर (ता. मोरखी गुजरात) येथे पळून गेले होते. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, निलेश मोरे, नम्रता जरे यांनी दोघांना मोरवी येथून ताब्यात घेतले. वैद्यकीय चाचणीत मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यावर आरोपी विजय विरुद्ध पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत जवखेडा येथील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला सुरेश दयाराम मालचे (वय ३३) याने २१ डिसेम्बर २०२२ रोजी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. ते दोघेही सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी येथे पळून गेले होते. मंदिरात लग्न लावले. नंतर भडाणे (ता चांदवड जिल्हा नाशिक) येथे आले. आरोपी सुरेश याने आपल्या पहिल्या पत्नी व मुलांना बोलावून घेतले होते. पोलीस नाईक कैलास शिंदे, भूषण पाटील यांनी दोघांना चांदवड येथून ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे यांनी मुलीचा जबाब घेतला असता अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे समजले. आरोपीला पोक्सो कायद्याप्रमाणे अटक करण्यात आली आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास अमळनेर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या