Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedअखिल भारतीय साहित्य परिषदतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

अखिल भारतीय साहित्य परिषदतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-अखिल भारतीय साहित्य परिषद शाखा अमळनेर यांच्यावतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक एन. के. कुलकर्णी होते. त्यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व सदस्य यांनीही ग्रंथ पूजन केले तसेच नुकत्याच जिल्हा कार्यकारिणीवर निवड झालेल्या विवेक जोशी यांचा सत्कार करण्यात आला .तसेच आगामी काळात अमळनेर येथे होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात आपला सक्रिय सहभाग कसा देता येईल, याविषयी चर्चा झाली .त्या संदर्भात म. वा, मडळाला अभिनंदन पर पत्र देण्याचाही ठराव झाला ,यावेळी कुलकर्णी यांनी गुरु व त्यांचे महत्त्व या विषयावर उपस्थितांना आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून मार्गदर्शन केले. यावेळी अमळनेर शाखा कार्यकारिणीतील मंगेश काळकर , दीपक खोंडे, प्रज्ञा जोशी ,श्रीमती स्नेहा एकतारे ,अशोक पाटील ,आशिष चौधरी तसेच देवगिरी प्रांत कार्यकारणी सदस्य शैलेश काळकर उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक खोंडे यांनी केले तर आभार मंगेश काळकर यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या