नंदूरबार/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नंदूरबार जिल्हा शासकीय रुग्णालयातून डॉ.रिजवान सैय्यद यांची दुचाकी मोटारसायकल एम एच ३९.टी .४६५७ ( हिरो स्प्लेण्डर प्लस ) अज्ञाताने चोरून नेल्याची घटना काल घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डॉ.सैय्यद हे नेहमीप्रमाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात कामावर गेले होते. त्यांनी त्यांची दुचाकी मोटारसायकल जिल्हा रुग्णालयातील संरक्षक भिंती जवळील पार्किंग मध्ये लावली. मात्र सायंकाळी कामावरुन घरी जाण्याच्या वेळी दुचाकी पार्किंग केलेल्या जागेवर मिळून न आल्याने डॉ.रिजवान सैय्यद यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र तरीही ती मिळून आली नाही. नंदूरबार शहर पोलिसात दुचाकी चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुहा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत. नंदूरबार जिल्हा रुग्णालय परिसरात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसह. डॉक्टर देखील हैराण झाले आहेत.पोलिसांनी त्या परिसरात लक्ष घालावे किंवा एक पोलीस कर्मचारी तैनात करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.