Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedइंद्रायणी नदीच्या पात्रात उडी घेऊन नवविवाहितेची आत्महत्या

इंद्रायणी नदीच्या पात्रात उडी घेऊन नवविवाहितेची आत्महत्या

पुणे/प्रतिनिधी राहुल पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्रात विवाहितेचा छळ, धमकी देणे ,आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा प्रकारच्या घटना वाढत चालल्या आहेत, पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीच्या पात्रात उडी घेऊन नवविवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. तिचे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. ही दुर्दैवी घटना घडली होती. पण या प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे.

प्रज्ञा कौशल भोसले असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञा ही इंदोरी येथे इंद्रायणी नदीत बुडाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांनी पोलिसांच्या मदतीने तिचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला. या घटनेबाबत सासरच्या मंडळींविरोधात छळाबाबत प्रज्ञाचा भाऊ प्रतीक चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली होती. रणजित जाधव या प्रकरणाचा तपास करत होते. पोलिसांनी तिच्या सासरच्यांकडे चौकशी केली असता छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार प्रज्ञाचा कौशल भोसलेबरोबर ११ मे रोजी विवाह झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसातच तिला दुचाकी आणि सोन्याची चेन आण म्हणून सारखा तगादा सुरू केला. पण तिच्या माहेरची परिस्थिती हालाखीची होती, त्यामुळे ते असमर्थ होते. त्यामुळे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु होता ,त्यामुळे कंटाळून तिने जीवनयात्रा संपविली.पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या